३६ वर्षीय महिलेवर बलात्कार ! ७५ वर्षीय वकिलावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे दि.१८ :- फ्लॅट नावावर करुन देतो, असे सांगून महिलेला फ्लॅटवर घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार करणार्‍या एका ज्येष्ठ वकिलावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वसंत धडकु पाटील (वय ७५, रा. गोदरेज रोझवूड सोसायटी, शिवाजीनगर असे गुन्हा दाखल झालेल्या वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढव्यात राहणार्‍या एका ३६ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ८२९/२२) दिली आहे. हा प्रकार डेक्कन, गोकुळनगर – कोंढवा आणि शनिवार पेठेत मार्च २०१९ ते १८ मे २०२२ दरम्यान घडला.

हेही वाचा :- मृत वीज कंत्राटी कामगारांच्या वारसांना CSR फंडातून आर्थिक मदत देण्याची महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांची मागणी

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा व्यवसायाने वकिल असून फिर्यादी यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांच्याविषयी पतीला उलट सुलट सांगण्याची भिती दाखविली. फिर्यादीच्या लहान मुलाचे बरेवाईट करण्याची भिती दाखविली. फिर्यादीने त्याच्याकडून हेवी डिपॉझिटवर घेतलेला फ्लॅट फिर्यादीच्या नावावर करुन देण्याचे आमिष दाखविले. त्यांना शनिवार पेठेतील फ्लॅटवर घेऊन जाऊन त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. त्यांच्या या त्रासाला कंटाळून शेवटी फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली असून सहायक पोलीस निरीक्षक शिळमकर तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.