प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत 26 डिसेंबर 2018 पर्यंत 33.66 कोटी खाती
नवी दिल्ली, दि.०८ – बँकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत 26 डिसेंबर 2028 पर्यंत 33.66 कोटी बँक खाती आहेत यापैकी 28.16 कोटी खाती कार्यरत आहेत. संबंधित खातेधाराने विनंती केल्यास बँक खाते बंद करण्यात येते.
हेही वाचा :- प्रधानमंत्री फसल विमा योजना
रिझर्व्ह बँकेच्या पत्रकानुसार केवायसी निकषांची पूर्तता न करणाऱ्या अथवा त्या संदर्भात माहिती न देणाऱ्या खातेदाराला नोटीस दिल्यानंतर टप्प्याटप्प्याने खाते बंद करण्याची परवानगी बँकांना आहे. प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्याबद्दल दंड आकारला जात नाही. केंद्रीय वित्त राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
Please follow and like us: