कल्याण डोंबिवलीतील ३१ गुंड तडीपार…
डोंबिवली दि.१७ : लोकसभा निवडणूकीची आचार संहिता जाहीर झाल्यानंतर कल्याण डोंबिवलीतील विविध पोलीस ठाण्यातील ३१ गुंडांना तडीपार करण्यात आले तसेच शिरढोन येथील जंगलात तयार करण्यात आलेली गावठी दारू व त्याचे साहित्य सुमारे ८ लाख ३३ हजार किमतीचे जप्त करण्यात आले.
मानपाडा पोलीस ठाण्यात तातडीने आयोजित पत्रकार परिषदेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांनी वरील माहिती दिली. लोकसभा निवडणुकीत हातभट्टी दारू ,मादक पदार्थ ,अवैध हत्यारे बाळगण्यास मनाई असल्याने वरील कारवाई करण्यात आली शिरढोन जगलात गावठी दारू तयार करण्यात येत असल्याची खबर गुन्हा प्रकटीकरण शाखेला मिळाली होती त्यानुसार छापा टाकून वरील धाड टाकन्यात आली. विष्णू हरी पाटील व इतर ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Please follow and like us: