अंधेरी पूर्व मतदारसंघात ३१.७४ टक्के मतदान – ६ नोव्हेंबरला मतमोजणी

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.०३ :- अंधेरी पूर्व’ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडले.‌ येथे ३१.७४ टक्के मतदान झाले. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ अशी मतदानाची वेळ होती. सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली.

मतदान प्रक्रियेसाठी अडीच हजारांहून अधिक अधिकारी / कर्मचारी, मुंबई पोलीस दल आणि इतर सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, ७० सूक्ष्म निरीक्षकही कर्तव्यावर होते.

२५६ मतदान केंद्रांपैकी मरोळ एज्युकेशन अकादमी हायस्कूल येथे मतदान केंद्र क्रमांक ५३ मध्ये ‘सखी मतदान केंद्र’ स्थापन करण्यात आले होते. येत्या ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.