29 ऑक्टोबर-3 नोव्हेंबर या काळात दक्षता सप्ताह साजरा होणार
नवी दिल्ली, दि.२६ – केंद्रीय दक्षता आयोग, सरदार वल्लभभाई पटेल यांची 31 ऑक्टोबर ही जयंती असणारा आठवडा दरवर्षी “दक्षता सप्ताह” म्हणून साजरा करते. यावर्षी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या काळात दक्षता सप्ताह साजरा केला जाणार असून “भ्रष्टाचार निर्मुलन-नवभारताची उभारणी” ही यावर्षीची संकल्पना आहे.
भ्रष्टाचाराविरोधातल्या लढ्यात एकत्रित सहभागी व्हावे यासाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती वाढविण्यावर या आठवड्यात भर देण्यात येतो.
या आठवड्यात सर्व केंद्रीय संस्था, मंत्रालय यांनी आपापल्या संस्थेत तसेच नागरिकांसाठीही यंदाच्या संकल्पनेशी संबंधित कार्यक्रम आयोजित करावेत असे दक्षता आयोगाने म्हटले आहे.
एकतेची शपथ, मुख्य ठिकाणी पोस्टर, बॅनर, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांविषयी जागृती करण्यासाठी व्याख्याने, गटचर्चांचे आयोजन, निबंध लेखन, वकृत्व स्पर्धा, नैतिक मूल्यांसंदर्भात पोस्टर, घोषवाक्य स्पर्धा यासारखे विविध कार्यक्रम करण्यात येणार आहेत. जागृतीपर ग्रामसभांचे आयोजनही या काळात करण्यात येणार आहे.