बैलगाडी शर्यतीसाठी साताऱ्यात राज्यव्यापी आंदोलन
(विराज भोईर)
सातारा : बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी या मागणीसाठी राज्यातील बैलगाडी चालक-मालक संघटना आक्रमक झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी न्यायालयात पाठपुरावा करावा, या मागणीसाठी आज (सोमवार) राज्यातील बैलगाडी चालक-मालक संघटनांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले.
आंदोलनात पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, जालना, औरंगाबाद, बीड, अमरावती, नगर यासह अन्य जिल्यातून शेतकरी सहभागी झाले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैलानां बांधत घोषणाबाजी केली. जो पर्यंत मागणी मान्य होणार नाहीत तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतली.
यावेळी शेतकऱ्यांनी बैलाच्या पाठीवर मला वाचवा, पेठा हटवा, अशा पध्दतीचे स्लोगन लिहल्याचे दिसून येत होते. दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.