जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्तीच्यावेळी प्रथमोपचाराचे प्रशिक्षण

 ( श्रीराम कांदु )

ठाणे दि १४: १३ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी जागतिक आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या अंतर्गत आपत्ती निवारणाविषयी जनजागृती करून यासंबंधी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्या अंतर्गत काल जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या सूचनेप्रमाणे येथील नियोजन भवनाच्या सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आपत्तीच्यावेळी प्रथमोपचार कसे करावेत याची रंगीत तालीम करण्यात आली.

यावेळी प्रशिक्षकांनी कर्मचाऱ्यांना प्रथमोपचार कसे करावेत, बँडेज कशी बांधावीत, कृत्रिम श्वसन कसे द्यावे, दोरीच्या गाठी कशा बांधाव्यात, विमोचन पद्धती, तसेच जखमी व्यक्तींना कसे उचलून न्यावे ते प्र्त्यक्शिकासः समजावून सांगितले. नागरी संरक्षण उपनियंत्रक श्रीमती शो. कि. मेहराळे, सह नियंत्रक सुधाकर सूर्यवंशी, दयानंद पुरळकर, दीपा घरात व त्यांच्या पथकाने मार्गदर्शन केले.

तहसीलदार स्मिता मोहिते, अंजली पवार यांनी देखील यावेळी आपत्ती व्यवस्थापनाचे महत्व समजावून सांगितले. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अस्मिता निकम यांनी आभार मानले.  

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email