शाळेतील शिपायाचा 6 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न,कल्याणतील धक्कादायक घटना

डोंबिवली : श्रीराम कांदू
एका 6  वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेतील एकां  शिपायाने लैंगीक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कल्यान मध्ये उघडकीस आली आहे .या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात नराधम शिपाई प्रदीप महाजन विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे .
          कल्यान पश्चिमेकडील डी. एन. देसाई शाळेत घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे पालकवर्गासह नागरिकांमधून संतापाची व्यक्त करण्यात येत आहे. 10 तारखेला दुपारी सदर पीडित 6 वर्षीय विद्यार्थिनी शाळेत गेली. दुपारी 3 च्या दरम्यान ती प्रसाधान गृहात गेली असताना अचानक याच शाळेत शिपाई प्रदीप महाजन या वासनांध नराधमाची नजर तिच्यावर पडली. तिच्या मागे प्रसाधनगृहात गेला व त्याने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या मुलीने तेथून पळ काढला. तिने हा घडलेला किळसवाणा प्रकार आपल्या आईला सांगितला. हा प्रकार ऐकून तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. तिने थेट खडकपाडा पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंद केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी शिपाई प्रदीप महाजन विरोधात गुन्हा नोंद करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

Leave a Reply

Your email address will not be published.