सोमवारी २७ गावांचा केडीएमसी मुख्यालयावर धडक मोर्चा

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.१४ :- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावांतील मालमत्तांना कोणतेही निकष न लावता भरामसाठ करवाढ (घरपट्टी) केल्याच्या व २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीसाठी येत्या सोमवारी केडीएमसी मुख्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. सर्व पक्षिय युवा मोर्चासह संलग्न आगरी-कोळी भूमिपुत्र महासंघाने या मोर्चासाठी पुढाकार घेतला आहे. मागील दहा दिवसांपासुन २७ गावांत या मोर्चाची जनजागृती मोहिम संघटनेमार्फत सुरू होती. प्रत्येक गावांमध्ये या भ्रष्ट आणि नियोजन शून्य कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाविरोधात रोष प्रकट होत गेला.

हेही वाचा :- जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यात बदल

विकासाच्या गोंडस नावाखाली २७ गावांतील शेतकऱ्यांच्या शेत जमिनी आरक्षित भूखंडासाठी गिळंकृत करण्यासाठी ही गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. कोणत्याही नागरी सुविधा नसताना मालमत्ता कर मात्र १० पटीने आकरण्यात सुरूवात केली आहे. कोणतेही निकष न लावता केवळ ग्रामपंचायतीमधील नोंदीनुसार या गावातील मिळकतींना नविन मुल्यांकानूसार मालमत्ता कर आकारणीला सुरूवात केली आहे.

हेही वाचा :- डोंबिवलीत मंगळसूत्र चोराला चोप

हाच मालमत्ता कर शहरी भागामधील जून्या मालमत्तांना आजही तत्कालीन ग्रामपंचायत मुल्यांकानूसार येत असताना २७ गावांतील नागरीकांना वेगळा न्याय का ? तसेच आरोग्य केंद्र, मराठी शाळा आजही जिल्हा परिषदेअंतर्गत असतांना मालमत्ता करामध्ये शिक्षण करही घेतला जातो. आज गावातील अंतर्गत रस्ते, गटार, पायवाटा, पथदिव्यांची वाताहत झाली असताना कर मात्र भरामसाठ पद्धीतीने आकारले जात आहे.

हेही वाचा :- गुडवीन ज्वेलर्सचे प्रमुख मालक असलेले सुनिलकुमार आणि सुधीरकुमार मोहनन अकराकरण यांना अटक

अग्यार समिती अहवालानूसार आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. त्यातच २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेबाबतचा अध्यादेश राज्य शासनाने प्रसिद्ध केला आहेच. जर गावांचा विकास करता येत नसेल तर तसा महासभेतील ठराव राज्य शासनास पाठवावा व येथील मालमत्तांना ग्रामपंचायत मुल्यांकानूसार कर आकारणी करावी, अशी मागणी या मोर्चाद्वारे करणार असल्याचे सर्व पक्षिय युवा मोर्चा आणि आगरी-कोळी भूमिपुत्र महासंघाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.