27 गावातील पाणी प्रश्नाला प्राधान्य देणार -महापौर राणे 

(श्रीराम कांदु)
डोंबिवली –  कल्याण डोंबिवलीतील 27 गावामध्ये पाणी प्रश्न मोठा असून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे नवनिर्वाचित महापौर विनिता राणे यांनी सांगितले 
महापौर म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी डोंबिवलीतील शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला तसेंच डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले त्या नंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या त्यांचे सोबत नगरसेवक विश्वनाथ राणे ,महिला आघाडी संघटक वैशाली राणे-दरेकर ,मंगला सुळे आदी शिवसैनिक उपस्थित होते. 
नवनिर्वाचित महापौर राणे म्हणाल्या पावसाळा तोंडावर आला असल्याने नाले सफाई व रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या प्रश्नातही लक्ष देणार असून आगामी पावसाळ्यापूर्वी ही दोन्ही कामे होतील यासाठी पाठपुरावा करणार आहे. ग्रामीण भागाचा पाणी प्रश्न तीव्र असून नागरिकांच्या भावना तीव्र आहेत त्यामुळे हा प्रश्न सुटण्यासाठी खास करून पाठपुरावा करणार आहे डोंबवलीच्या नागरिकांना भेटण्यासाठी महिन्यातून किमान दोन वेळा डोंबवली कार्यालयात उपस्थित रहाण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email