मोटारीने जाणारे अजित पवार प्रफुल्ल पटेलांमुळे विमानाने गेले आणि अपघात झाला
कल्याणमध्ये झालेल्या शोकसभेत प्रमोद हिंदूराव यांची माहिती
कल्याण : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अपघाताच्या आदल्या दिवशी मोटारीने बारामतीला जाणार होते. त्यासाठी सर्व तयारी केली. परंतु आयत्या वेळीस एक महत्त्वाचे काम घेऊन प्रफुल पटेल आले त्या कामाला वेळ लागला आणि अजितदादा मोटारीऐवजी दूसरे दिवशी विमानाने बारामतीकडे रवाना झाले. दुर्देवाने त्या विमानाला अपघात झाला आणि आपण अजिदादांना गमावले, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी दिली.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अजितदादा पवार यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सर्वपक्षिय शोकसभेचे आयोजन मंगेशी बँक्वेट सभागृहात करण्यात आले होते. या शोकसभेत सर्वपक्षिय कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजितदादांच्या अपघाताची बातमी आपल्याला फोनद्वारे समजली, लगेचच त्यांच्या स्वीय सहाय्यकांकडून संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर पुढील तीन तास आपण सुन्न झालो होतो. जिल्हा परिषद निवडणूकीच्या प्रचारासाठी अजितदादा बारामतीमध्ये सभा घेणाार होते. सभेला जाण्यासाठी आदल्या दिवशी संपूर्ण तयारी केली.
सर्व सामान मोटारगाडीत भरले, जाण्याची तयारी झाली तेवढ्यात प्रफुल पटेल यांनी एका कामाची फाईल आणली. ते काम करता करता उशिर झाला आणि अजितदादांनी मोटारीने जाण्याऐवजी दुसरे दिवशी विमानाने जाण्याचे ठरविले. त्यानंतर अकल्पित घटना घडली अशी आपल्याला माहिती मिळाल्याचे प्रमोद हिंदूराव यांनी आपल्या श्रध्दांजलीपर भाषणात सांगितले.
अजितदादांबरोबर आपले ३९ वर्षे अतिशय जवळचे संबंध होते. त्यांचा दुसरे दिवशी होणारा कार्यव्रâम आपल्याकडे नेहमी पोहचत असे. दादांच्या अनेक कामांचे आपण साक्षीदार आहोत.
कल्याणला आपल्या घरी दादा आणि सुनेत्रा वहिनी अनेकदा येवून गेल्या. दादांनी शेवटची भेट आपल्या घरी दिली तेव्हा आपण त्यांना माळशेज घाटापर्यंत सोडायला गेलो होतो. त्यासमयी झालेल्या संवादाची माहिती देत दादांच्या अनेक आठवणी जागविल्या.
दादांबरोबर आपण इस्त्रायलला शेती विषयक परिषदेसाठी गेलो होतो. अने देशांचे प्रतिनिधी तेथे आले होते. भारताकडून तत्कालिन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे सादरीकरण सर्वोत्कृष्ट ठरले. दादा पहिल्या रांगेमध्ये होते. तर आम्ही चौथ्या रांगेत होतो.
गिरीश कुबेर माफी मागा – कपिल पाटील
त्यासमयी दादा म्हणाले असे सादरीकरण महाराष्ट्रातील नेत्यांनी, शेतकर्यांनी केले पाहिजे. नरेंद्र मोदी यांचे सादरीकरण पाहून दादा म्हणाले हा माणूस एक दिवस देशाचा पंतप्रधान नक्की होईल ! एवढी पारख दादांना होती.
दादांच्या बरोबर अनेक कार्यव्रâमात सहभागी झालो. मुंबईत होत असलेल्या जनता दरबारात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला दादा भेटून सर्वांची तक्रार ऐकून घ्यायचे व संबंधित अधिकार्यांच्याशी बोलून प्रश्न मार्गी लावण्याची त्यांची एक वेगळीच कामाची पद्धत होती. गोरगरीब समाजाची जाण आणि गोरगरीबांचा कैवारी म्हणून दादांना ओळखले जायचे. स्वच्छतेकडे दादांचा मोठा कटाक्ष असे.
कुठल्याही प्रकारचे वेसण नसणारा नेता दादा होते, तसेच कार्यक्रमाला किंवा दौर्यावर जाताना सोबत असणारे सर्व कार्यकर्त्यांची विचारपूस करून माझ्या सोबत त्यांच्याही जेवणाची व्यवस्था करा असे दादा बजावीत असत. दोन महिन्यांपूर्वी दसर्याच्या दिवशी दादा मुरबाड येथे पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनसाठी आले होते.
त्यावेळेस म्हणाले माझ्या कार्यालयापेक्षा तुझे कार्यालय मोठे आहे तसेच आपला मुलगा प्रतिक याला बसण्यासाठी दादांनी आपली खुर्ची पुढे केली होती. आजही त्यांच्या अनेक आठवणी माझ्या मनात आहेत. दादांचे स्मारक व अन्य काही करणार असाल तर त्यासाठी मी नक्की पुढे असेन अशी ग्वाही दिली.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले की जन्म व मृत्यू माणसाला कळत नाही. त्यांनी केलेले काम हे ज्या वेळेस ती व्यक्ती मरण पावते व त्यांच्या अंत्यविधीला जनसमुदाय जमतो तेव्हा त्यांनी केलेले काम किती मोठे आहे हे समजते, अजित दादांनी बारामती मॉडेल तयार केले, ते एकदा जाऊन बघा.
दादांनी जे काम केले तसे काम प्रत्येक प्रभागात प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात करा व दादांना कामातून श्रद्धांजली अर्पण करा असे सांगून जगन्नाथ शिंदे म्हणाले की, आपण सातवीत असल्यापासून शरद पवार यांच्या विचाराने प्रेरित झालो. भुवनेश्वर येथे झालेल्या अधिवेशनाला उपस्थित राहून प्रेरणा घेतली. गेल्या वर्षी आपला ७५वा वाढदिवस साजरा झाला. त्यासमयी आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक विवाह सोहळ्यास व रक्तदान शिबीरास दादांनी हजेरी लावली.
फक्त दहा मिनिटांसाठी येतो म्हणणारे दादा एक तास दहा मिनिटे थांबले. हा सार्वजनिक विवाह सोहळा कसा घडविला याची माहिती घेतली. रक्तदान शिबीराबद्दल आपले अभिनंदनही केले. माणसांना जपणारा नेता म्हणून दादा ओळखले जात होते. आपण सर्वांनी आपल्या कामातूनच दादांना खरी श्रद्धांजली वाहणार आहोत. दादा आजही आपल्यामध्ये जीवंत आहेत असे सांगितले.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले की, पूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र होती. त्यावेळेस मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो. त्यांच्या बरोबरीने काम केले आहे. त्यांची कामाची पद्धत मला माहीत आहे, तत्पर काम करणारे नेते होते, हळव्या मनाचे होते, शिस्तीचे व वेळेचे बंधन पाळणारे नेते होते.
अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच माझा विश्वास बसत नव्हता, अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश लटके यांनी कवितेतून अजित दादांनी श्रद्धांजली वाहिली.
ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. यशवंतराव चव्हाण विद्यापिठातून तयार झालेला शेवटचा लोकनेता असे सांगत अजितदादा यांच्या झटपट निर्णयाची माहिती दिली. दादांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपुरे राहिले. २००४ साली राष्ट्रवादीला जास्त जागा मिळूनही राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद घेतले नाही.
तेव्हा दादा मुख्यमंत्री झाले असते आणि आपल्याला वेगळा महाराष्ट्र बघायला मिळाला असता. महाराष्ट्राने एक अभ्यासू व चांगला लोकनेता गमावला आहे. अजितदादांना ग्रामीण व शहरी भागाची पूर्ण माहिती होती. दादा हे महाराष्ट्राच्या मातीतील नेते होते. साधू-संत-बुवाबाजी-कर्मकांडावर दादांचा विश्वास नव्हता. त्यांनी कधीही हाताला गंडेदोरे बांधले नाहीत. अजितदादांचा आदर्श आपण घेतला पाहिजे, हिच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल.
राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष वंडार पाटील यांनी सांगितले की अजित पवार यांची घटना कानावर पडताच विश्वास बसत नव्हता. अनेकांचे फोन आले, मी रडलो, आपला लोकनेता सोडून गेला, संपूर्ण महाराष्ट्रावर तसेच बारामतीवर दु:खाचे सावट पसरले. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना दु:ख झाल. लाखो जनसमुदाय उपस्थित होता हिच त्यांच्या कामाची पावती होती.
राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुभाष गायकवाड यांनी सांगितले की, दादांनी मला फोन करून सांगितले की तुझी महाराष्ट्र प्रदेश वर सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. तुला काम करावे लागेल. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठे पद दिले. दादांचे स्मारक कल्याण येथे झाले पाहिजे.
यावेळी नगरसेवक वरूण पाटील, माया कांबळे, माजी नगरसेवक संजय पाटील, प्रकाश तरे, ठाकरे सेनेचे शहरप्रमुख बाळा परब, आम आदमी पक्षाचे शैलेश जोगदंड, मराठा ज्ञाती समाजाचे योगेश देशमुख, शिंदे सेनेचे प्रवक्ते किरण सोनवणे, पत्रकार विष्णुकूमार चौधरी, उत्तम रोकडे, रमेश साळवे, रमेश बर्वे, प्रशांत माळी, राणी कपोते, नितीन सकपाळ, स्वप्निल ताकावणे, पारसनीस तिवारी, राष्ट्रवादी शरद गटाचे शहराध्यक्ष स्वप्निल रोकडे, दिपक ठाकूर, शत्रुघ्न भोईर, खैरे सर यांच्यासह सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोक सभेचे सूत्रसंचालन डॉ प्रदिप जगताप यांनी केले.
साभार – वरिष्ठ पत्रकार तुषार राजे यांच्या फेसबुक पेज वरून
