ठळक बातम्या

रवींद्र चव्हाण यांनी भाजप कमकुवत असलेल्या जागेवरून निवडणूक लढवावी आणि जिंकावे

रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार झाले असून राज्याच्या महत्त्वाच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रीपदही त्यांनी भूषवले आहे. डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मतदारांचा बालेकिल्ला मानला जातो. भारतीय जनता पक्षाकडून तिकीट मिळालेल्या कोणत्याही व्यक्तीला येथून सहज विजय मिळेल.

विधानसभा निवडणुकीत कल्याण डोंबिवलीच्या चारही जागांवर भाजपचा पराभव होण्याची चिन्हे

अशा स्थितीत रवींद्र चव्हाण यांनी येथून आपली बोली सोडून भाजप कमकुवत असलेल्या अन्य जागेवरून निवडणूक लढवावी आणि जिंकावे. आणि डोंबिवली विधानसभेची ही जागा स्थानिक भाजपच्या लोकमान्य अशा कार्यकर्त्याला द्यावी.

भाजपने ब्राह्मण समाजाला गृहीत धरू नये – महाराष्ट्र ब्राह्मण सभा

हे म्हणणे आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी लहानपणापासूनचे स्वयंसेवक आणि भाजपचे माजी नगरसेवक यांचे. आपल्या नाव नाही छापून येणारं ह्या अटी वर ते मुंबई आसपासशी खास संवाद साधताना आपले मनोगत व्यक्त करत होते.

मला धनंजय कुलकर्णी व्हायचं नाही ! डोंबिवलीतील भाजपाच्या इच्छुक उमेदवारांनी टाकली नांगी, इच्छुकांना कोणाची भीती?

त्यांचा म्हणण्यानुसार, भाजप पक्षनेतृत्वाने त्यांना डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास संघ परिवाराच्या मतदारांच्या पाठिंब्याने ते येथून सहज विजयी होऊ शकतात.

रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात दिपेश म्हात्रे? चव्हाण हे म्हात्रे यांना गांभीर्याने घेणार ?

त्यांच्या म्हणण्यानुसार, डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार निवडीसाठी पक्षाचे निरीक्षक नुकतेच आले असता त्यांनी फॉर्म दिलेला असताना त्या फॉर्ममध्येही त्यांनी आपले नाव प्राधान्याने दिले होते. आणि डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपकडे उमेदवारी मागितली होती.

डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटाचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांचा ठाकरे गटात प्रवेश

यांच्या म्हणण्यानुसार भाजपने त्यांना उमेदवारी दिल्यास ते पुर्ण ताकदीने निवडणूक लढवतील आणि या जागेवर भाजपचा विजय निश्चित करतील.