ठळक बातम्या

भाजपचे माजी नगरसेवक आणि बांधकाम व्यावसायिक मंगेश गायकर यांचा कडून मिसफायर, मंगेश आणि त्यांचा मुलगा जखमी


कल्याण- माजी नगरसेवक मंगेश गायकर व त्यांचा मुलगा चुकून मिसफायर झाल्याने जखमी झाले आहेत. या घटने नंतर कल्याण पश्चिमेतील चिकनघर संकुलात खळबळ उडाली.

प्राथमिक माहितीनुसार, गायकर हे त्यांच्या कार्यालयात बसून परवानाधारक रिव्हॉल्व्हर साफ करत होते. त्याच क्षणी चुकून मिसफायर झाली आणि या मिसफायरमुळे गायकर आणि त्यांचा मुलगा जखमी झाला. दोघांनाही कल्याणच्या मीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश गायकर हे दुपारी त्यांचा मुलगा आणि काही व्यापारी मित्रांसह चिकणघर येथील कार्यालयात बसले होते. यावेळी मंगेश गायकर हे त्यांचे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर साफ करत होते.

रिव्हॉल्व्हर साफ करत असताना चुकून मिसफायर झाली. या गोळीबारात गायकर व त्यांचा मुलगा जखमी झाला. दोघांनाही तात्काळ कल्याण पश्चिम येथील मीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गोळीबाराचे वृत्त कल्याणमध्ये पसरताच चर्चेचा बाजार चांगलाच तापला. तर पोलिसांनी प्राथमिक माहिती देताना तपासानंतर सत्य बाहेर येईल असे सांगितले आहे. सायंकाळी उशिरा पोलिसांनी पत्राद्वारे कळविले की, हे प्रामुख्याने मिस फायरिंगचे प्रकरण आहे,

त्यात मंगेश गायकर यांचा मुलगा शामल गायकर, मिसफायर मुळे गोळी कार्यालयाच्या काचेवर लागली आणि ही काच शामल यांच्या तळहातावर लागली. ज्यात तो जखमी झाला आहे.