कळंबा कारागृहात कैद्यांमध्ये राडात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या
कोल्हापुरच्या कळंब कारागृहात कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. या मारहाणीत मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल याची हत्या करण्यात आली आहे. मुन्ना हा 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याचे सांगण्यात येत असून या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरुन गेला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापुरमधील कळंबा कारागृहात आज कैद्यांच्या दोन गटांमध्ये मारामारी झाली. या मारहाणीत मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता याची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण पोलीस प्रशासन हादरुन गेले असून कारागृहातील बेशिस्त पुन्हा आली चव्हाट्यावर आली आहे.
मारहाणीत मृत्यू झालेला मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता हा १९९३च्या मुंबई बाँम्बस्फोटातील आरोपी असून तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता, अशी माहिती समोर आली आहे. आज सकाळी साडेसात वाजण्याचे सुमारास कारागृहातील तो हौदावर आंघोळ करण्यासाठी गेला असता त्याचा इतर कैद्यांशी वाद झाला.