मालाड जलाशय ते लोखंडवाला संकुल आप्पापाडादरम्यान महापालिका प्रशासनातर्फे उड्डाणपूल बांधण्यात येणार
मुंबई दि.०९ :- मालाड पश्चिम येथील मालाड जलाशय ते लोखंडवाला संकुल आप्पापाडादरम्यान बृहन्मुंबई महापालिका प्रशासनातर्फे नवीन उड्डाणपूल पूल बांधण्यात येणार आहे. हा पूल गोरेगाव-मुलुंड लिंक रस्त्याला जोडला जाणार असून यामुळे बोरिवली ते मुलुंड हे अंतर फक्त एक तासात पार करता येणार आहे.
रस्त्याची कामे रखडविणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द
महापालिका विकास आराखडा २०३४ मध्ये हा उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा ३० टक्के भार कमी होईल, असे महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले.