ठळक बातम्या

नम्रता आणि संयम हेच नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन

‘वयंम् चळवळी’चे मिलिंद थत्ते यांचे प्रतिपादन

डोंबिवली दि.०१ :- ‘नम्रता आणि संयम हेच नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आहे’ असे प्रतिपादन ‘वयंम् चळवळी’चे मिलिंद थत्ते यांनी येथे केले. पर्यावरण दक्षता मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘वनातल्या जनांच्या मनातल्या गोष्टी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ मानसी जोशी होत्या. पर्यावरण दक्षता मंडळाच्या सदस्यांनी पर्यावरण गीत आणि यशराज कला मंच डोंबिवली यांनी आदिवासी नृत्य सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना अभिवादन

पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी थत्ते यांच्या कार्याचा परिचय करून दिला. पर्यावरण दक्षता मंडळाच्या २०२४ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. रूपाली शाईवाले यांनी पर्यावरण दक्षता मंडळाच्या डोंबिवलीतील कामाची माहिती दिली.

राष्ट्रीय रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे मुंबईत मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन

डोंबिवली कल्याण मधील इयत्ता सातवी , आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण विषयक चित्रकला स्पर्धा आणि खुली पर्यावरणविषयक रील स्पर्धा आयोजित केली होती. त्यांचा बक्षीस समारंभही यावेळी पार पडला. पर्यावरण दक्षता मंडळाच्या सदस्या डॉ अंजली रत्नाकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा जोशी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *