ठाणे परिवहन सेवेची डोंंबिवली ते दिवा बससेवा सुरू
ठाणे दि.३१ :- ठाणे महापालिका परिवहन सेवेतर्फे डोंंबिवली ते दिवा अशी बससेवा सुरू करण्यात आली आहे. डोंबिवली पूर्व येथील बाजीप्रभू चौक ते दिवा पूर्व रेल्वे स्थानक या दरम्यान ही बससेवा आहे. सकाळच्या वेळेत दुपारी १२ वाजेपर्यंत चार आणि दुपारी ४ ते रात्री १० दरम्यान चार फेऱ्या असे बसचे नियोजन आहे.