ठळक बातम्या

ठाणे महापालिकेतर्फे येत्या १ ते ३ डिसेंबर दरम्यान पं. राम मराठे संगीत महोत्सवाचे आयोजन

ठाणे दि.३१ :- ठाणे महापालिकेतर्फे येत्या १ ते ३ डिसेंबर या कालावधीत गडकरी रंगायतन येथे संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या महोत्सवाचे २८ वे वर्ष असून महोत्सवातील सर्व कार्यक्रमांना रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. या महोत्सवात पं. सुरेश तळवलकर यांना राज्यस्तरीय तसेच निषाद बाक्रे यांना युवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच पंडित राम मराठे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांच्यासोबत काम केलेल्या सात ज्येष्ठ कलाकारांचा यावेळी कृतज्ञता सन्मान करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे मुंबईत मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन

महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात पं. राम मराठे यांचे नातू युवा गायक भाग्येश मराठे यांच्या गायनाने होणार आहे. तर, ज्येष्ठ सरोद वादक सुजात खान यांच्या सरोद वादनाने पहिल्या दिवसाची सांगता होईल. या दोन्ही कार्यक्रमांच्या मध्यांतात पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. महोत्सवाचा दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ वादक भीमण्णा जाधव यांच्या सुंदरी वादनाने सुरु होणार आहे. या कार्यक्रमानंतर नृत्यांगना शर्वरी जमेनिस यांचे नृत्य सादरीकरण होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त

कार्यक्रमाची सांगता ज्येष्ठ गायिका शुभा मुदगल यांच्या गायनाने होईल. तिसऱ्या दिवशी युवा कलाकार शाश्वती चव्हाण यांचे गायन आणि मंजिरी वाठारे यांचे नृत्य सादरीकरण होणार आहे. यानंतर, पं. राम मराठे यांचे पुत्र मुकुंद मराठे यांनी दिग्दर्शित केलेल्या संगीत मंदारमाला या नाटकाचा प्रयोग होणार आहे. महोत्सवाची सांगता ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे देशपांडे आणि ज्येष्ठ गायक पं. संजीव अभ्यंकर यांच्या ‘जसरंगी’ या अनोख्या कार्यक्रमाने होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *