आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या राज्याच्या खेळाडूंना १ कोटी रूपयांचे बक्षिस – उपमुख्यमंत्री अजित पवार
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना क्रीडा ध्वजप्रदान
मुंबई दि.२५ :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्यापासून गोव्यात सुरु होत असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे नऊशे खेळाडू सहभागी होत आहेत. आपले खेळाडू यावेळीही उत्तम कामगिरी करून आणि सर्वाधिक पदके जिंकून महाराष्ट्राला अव्वल स्थान मिळवून देतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केला.
शबरी सेवा समितीतर्फे नवरात्रोत्सवात कन्यापूजन कार्यक्रम
९०० खेळाडू व २०० मार्गदर्शक अशा एकूण ११०० सदस्यांच्या महाराष्ट्राच्या पथकाकडे क्रीडाध्वज हस्तांतर करण्याच्या सोहळ्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. क्रीडामंत्री संजय बनसोडे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनचे महासचिव नामदेव शिरगावकर आदी यावेळी उपस्थित होते.
विशेष ऑलिम्पिकमधील सहभागी महाराष्ट्रातील खेळाडू, प्रशिक्षकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
राज्य सरकार सातत्याने खेळ आणि खेळाडूंच्या पाठीशी उभे राहीले आहे. चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या, राज्याच्या खेळाडूंना १ कोटी रूपयांचे आणि मार्गदर्शकाला १० लाख रुपयांचे बक्षिस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचा अध्यादेश काढला आहे. आशियाई स्पर्धेतल्या रौप्यपदक विजेत्या खेळाडूला ७५ लाख रूपये आणि मार्गदर्शकाला ७ लाख ५० हजार रुपये मिळणार आहेत. कांस्यपदक विजेत्या खेळाडूला ५० लाख आणि मार्गदर्शकाला ५ लाख रुपयांचे रोख बक्षिस देण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.