दसऱ्याच्या मूहूर्तावर मुंबईत ९ हजार ५७२ वाहनांची नोंदणी
मुंबई दि.२५ :- मुंबईतील चार प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागात दस-याच्या दिवशी एकूण ९,५७२ वाहनांची नोंदणी झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ही संख्या ४७५ ने वाढली आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर चार नवीन मराठी नाटकांची घोषणा
दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहनाचा ताबा घेण्यासाठी प्रत्यक्षात काही दिवस आधी वाहन खरेदी-नोंदणीचे प्रमाण वाढते. यंदा १६ ते २४ ऑक्टोबरदरम्यान राज्यात ८०,१८६ वाहनांची खरेदी झाली. गेल्यावर्षी दसऱ्यापूर्वी २७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत ७६,१५७ वाहनांची खरेदी झाली होती.