नवी मुंबईत आता दिवसातून एकदाच सलग सहा ते सात तास पाणीपुरवठा
महापालिका प्रशासनाची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी
नवी मुंबई दि.१८ :- दिवसातून दोन वेळा पाणी वितरण करण्याऐवजी ते एकदाच सहा ते सात तास वितरित करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. नव्या नियोजनानुसार महापालिका प्रशासनाने तीन वेळा निश्चित केल्या असून याची बेलापूर ते कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली-दिघा अशी विभागणी करण्यात आली आहे.
कल्याण रेल्वे स्थानकात चार हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई, १६ लाखांपेक्षा अधिक दंड वसूल
सध्याच्या नियोजनानुसार संपूर्ण शहरात सकाळी आणि संध्याकाळी एकाच वेळेत पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, पाण्याचा दाब, भौगोलिक अंतर आदी कारणांमुळे काही विभागांना जास्त तर काहींना कमी पाणी मिळते. वितरणातील ही विषमता दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
दाट धुके पसरल्याने मध्य रेल्वेची उपनगरी वाहतूक उशिराने
वाशी विभागात सध्या जुन्या वेळापत्रकानुसारच पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. बेलापूर ते कोपरखैरणे विभागात पहाटे ४.३० ते सकाळी ११.३०, घणसोली विभागात रात्री ८.३० ते २ आणि ऐरोली व दिघा विभागात रात्री दोन ते सकाळी ८ या वेळेत पाणीपुरवठा केला जाणार आहे.