पोलीस हवालदार सोमनाथ गोडसे यांचे कर्तव्यावर असताना निधन
मुंबई, दि. १
डोंगरी येथील वाडीबंदर परिसरात गस्तीवर असलेले पोलीस हवालदार सोमनाथ गोडसे यांना शनिवारी रात्री चक्कर आल्यामुळे ते वाहनातच कोसळले.त्यांना तातडीने जे.जे.रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांना मृत घोषित केले.
गोडसे शनिवारी रात्र पाळीसाठी डोंगरी पोलीस ठाण्यात आले. ते डोंगरी-३ मोबाईल वाहनात कार्यरत होते. त्याच्यासह पोलीस हवालदार देसले हे देखील याच वाहनात कार्यरत होते. वाहन वाडीबंदर येथील गोदी परिसरात गस्त घालत असताना गोडसे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर वाहनातच चक्कर येऊन ते बेशुध्द झाले. त्यानंतर मोबाईल-१ वाहनाने गोडसे यांना सर जे.जे.रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून मध्यरात्री त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.