मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल
मुंबई, दि. १
मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. आजपासून (रविवार) नव्या वेळेनुसार रेल्वेगाड्या धावणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– मड गाव कोकणकन्या एक्स्प्रेस, मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्स्प्रेस, तिरुवनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेस, मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांचा यात समावेश आहे.
दरवर्षी रेल्वे प्रशासनाकडून लांबपल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात येते.