नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांचा ‘सुंदरी’ म्युझिक व्हिडीओ येत्या २ ऑक्टोबरला प्रदर्शित
मुंबई, दि. २९
लावणी सम्राट आणि नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांचा ‘सुंदरी’ हा पहिला म्युझिक व्हिडीओ येत्या २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन, नृत्यदिग्दर्शन, सादरीकरण आशिष पाटील यांनीच केले आहे.
आशिष पाटील, गिरिजा गुप्ते निर्मित हे गाणे अवधूत गुप्ते यांनी गायले अऐ संगीतकार प्रवीण कुवर आणि गीतकार असून मंदार चोळकर आहेत. एकवीरा म्युझिक प्रस्तुत, ‘सुंदरी’ या गाण्याचे छायाचित्रण हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.