अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री विशेष लोकल
अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री विशेष लोकल
मुंबई, दि. २५
पश्चिम रेल्वेकडून अनंत चतुर्दशीला (२८ सप्टेंबर) रात्री उशिरापर्यंत आठ विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. गुरुवारी मध्यरात्री आणि शुक्रवारी पहाटे चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट यादरम्यान या विशेष लोकल धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत.
चर्चगेटहून विरारसाठी रात्री १.१५, १.५५, २.२५ आणि ३.२० वाजता तर विरारहून चर्चगेटसाठी रात्री १२.१५, १२.४५, १.४० आणि पहाटे ३ वाजता लोकल सोडण्यात येणार आहेत.