बृहन्मुंबई महापालिकेतर्फे समुद्र किना-यांवर स्वच्छता मोहीम
मुंबई, दि. २५
पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेतर्फे मुंबईतील समुद्र किना-यांवर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
मोहिमेत महानगरपालिका कर्मचारी, कामगारांसह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गिरगाव चौपाटी, दादर, माहीम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा आदी किनाऱ्यांवर ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच निर्माल्य संकलन करण्यात आले.
समुद्राच्या भरतीमुळे किनाऱ्यावर वाहून आलेला कचराही गोळा करण्यात आला.