सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प; तुंगारेश्वर बोगद्याचे भुयारीकरण पूर्ण
मुंबई दि.२१ – सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्प्या पूर्ण करण्यात एमएमआरडीएला यश आले. या प्रकल्पातील चारपैकी सर्वात मोठ्या ४.६ किमी लांबीच्या तुंगारेश्वर बोगद्याचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे.
मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यातील आठ गाड्या मुंबईत दाखल
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वसई – विरार आणि मिरा – भाईंदर शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी भुयारीकरणाचे काम हाती घेतले होते. पूर्ण करून १८ महिन्यांनंतर टीबीएम यंत्र भूगर्भातून बाहेर काढण्यात आले. दुसरा टप्पा मे २०२४ मध्ये पूर्ण होणार असून हे काम पूर्ण झाल्यास मिरा-भाईंदर शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.
‘महारेरा’कडे नोंदविलेल्या ७४६ प्रकल्पांपैकी ३८८ प्रकल्पांची नोंदणी स्थगित; बँक खातीही गोठवली
वसई-विरार आणि मिरा-भाईंदरला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे १३२५.७८ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प हाती घेण्यात आला.
प्रकल्पाअंतर्गत ४०३ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला २०१७ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. काम सुरू झाल्यापासून ३४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काही अडचणींमुळे प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही.