टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे, विनामूल्य लेझीम प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
डोंबिवली दि.१८ :- अमृतमहोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या डोंबिवलीच्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सलग दुसऱ्या वर्षी विनामूल्य लेझिम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवलीतील पारंपरिक नृत्य निपूण विवेक ताम्हणकर यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले. सर्व वयोगटातील १२५ जण कार्यशाळेत सहभागी झाले होते.
‘शाळांमधून सुरू असलेला इस्लामी प्रचार रोखा’
पारंपारिक पध्दतीने निघणाऱ्या टिळकनगर गणेशोत्सवाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत, लेझिम खेळायला तरुणाईला सहभागी होता यावे म्हणून ढोल आणि हलगीच्या तालावर लेझिमच्या वेगवेगळ्या ठेक्यांवर विविध लेझीम प्रकार खेळण्याचा कसून सराव ताम्हणकर यांनी करुन घेतला. समारोपाच्या दिवशी मंडळाचे अध्यक्ष सुशील भावे यांनी आभार मानले तर मंडळाचे कार्यवाह बल्लाळ केतकर यांनी ताम्हणकर यांचा सन्मान केला.