भारतीय मजदूर संघाची मोटारसायकल यात्रा
पुणे दि.१८ :- विश्वकर्मा जयंतीनिमित्त कुरकुंभ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (तालुका दौंड, जिल्हा- पुणे) येथे भारतीय मजदूर संघातर्फे मोटारसायकल यात्रा काढण्यात आली होती.
यानिमित्त आयोजित कामगार मेळाव्यात बोलताना भारतीय मजदूर संघाचू राष्ट्रीय महामंत्री रविंद्र हिमते म्हणाले, भारतीय मजदूर संघ देशभरातील क्रमांक एकची कामगार संघटना आहे.
राष्ट्र, ऊद्योग आणि कामगार हेच संघटनेचे धोरण आहे. कायम आणि कंत्राटी कामगारांमधील आर्थिक दरी कमी करण्यासाठी त्रिपक्षीय प्रयत्न करणे आवश्यक आहे.
भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण, सचिव बाळासाहेब भुजबळ, कामगार महासंघाचे विभागीय सचिव सुरेश जाधव आदी यावेळी उपस्थित होते. अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी प्रास्ताविक केले तर राहूल गोरे यांनी आभार मानले.