यंदा हलालमुक्त गणेशोत्सव साजरा करा हिंदू जनजागृती समितीचे आवाहन
मुंबई दि.१८ :- सर्व गणेशभक्त आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदा ‘हलालमुक्त गणेशोत्सव’ साजरा करून देशाच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी केले आहे. हिंदू जनजागृती समितीतर्फे सोलापूर येथील ‘श्रमिक पत्रकार संघ’ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारतात सरकारच्या ‘FSSAI’ आणि ‘FDA’ यांसारख्या खाद्यपदार्थांचे प्रमाणीकरण करणार्या शासकीय संस्था असतांनाही हलालच्या नावे समांतर इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे.
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात काश्मिरच्या दल लेकमधील हाऊसबोटचा देखावा
या अर्थव्यवस्थेतून मिळालेल्या निधीचा वापर आतंकवाद्यांना कायदेशीर साहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात येत आहे. भारताच्या सुरक्षा आणि अखंडता यांच्या दृष्टीने केंद्र सरकारने खाजगी इस्लामी संस्थांना परवानगी देऊ नये, असेही घनवट यांनी सांगितले. सध्या चातुर्मास सुरू असून गणेश चतुर्थीही येत आहे. अशा वेळी आपल्या घरी हलाल प्रमाणित उत्पादने येणार नाहीत याची काळजी प्रत्येक हिंदूंनी घेतली पाहिजे. यासाठी आम्ही देशभर हलालमुक्त गणेशोत्सव हे अभियान राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवात हलालच्या विरोधात विविध उपक्रम राबवणार आहोत.
‘शाळांमधून सुरू असलेला इस्लामी प्रचार रोखा’
आज देशातील १५ टक्के मुसलमानांसाठीची ‘हलाल’ व्यवस्था उर्वरित ८५ टक्के गैरइस्लामी जनतेवर लादणे हे त्यांच्या संविधानिक धार्मिक अधिकारांच्या विरोधात आहे, असे घनवट म्हणाले. हलाल प्रमाणपत्रासाठी ४७ हजार रुपये शुल्क, तर दरवर्षी नुतनीकरणासाठी १६ ते २० हजार रुपये व्यापार्यांना द्यावे लागत आहेत. आता तर प्रत्येक आस्थापनात २ मुसलमानांना ‘हलाल निरीक्षक’ म्हणून सवेतन कामावर ठेवणे बंधनकारक केले आहे. यातून मोठ्या प्रमाणावर निधी खाजगी संस्थांकडे जाऊन केंद्र शासनाची मोठी आर्थिक हानी होत असल्याकडेही घनवट यांनी लक्ष वेधले.