एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता
मुंबई दि.०८ :- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरुन ३८ टक्के करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली.
रश्मी शुक्ला यांच्या विरोधातील दोन एफआयआर रद्द
सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर ९ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे आणि ए. राजा यांना अटक न केल्यास देशभर आंदोलन – हिंदू जनजागृती समिती
त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना २०३ टक्क्यांवरून वाढवून २१२ टक्के महागाई भत्ता देण्यात येणार आहे.