साहित्य- सांस्कृतिक

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे विनामूल्य लेझीम प्रशिक्षण कार्यशाळा

डोंबिवली दि.०६ :- टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे येत्या ११ ते १७ सप्टेंबर या कालावधीत विनामूल्य लेझीम प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्लास्टिकविरोधी कारवाईत आत्तापर्यंत २४ लाख ६५ हजार रुपयांचा दंड वसूल

मंडळाच्या पारंपारिक पध्दतीने निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझिम खेळायला तरुणाईला सहभागी होता यावे, यासाठी टिळकनगर शाळेच्या पेंढरकर सभागृहात संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. पारंपारिक नृत्यातील प्रशिक्षक विवेक ताम्हणकर कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत.

अवकाळीतील पीक कर्ज व्याज माफीची तत्काळ कार्यवाही करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कार्यशाळेत लेझीमचे विविध प्रकार शिकवण्यात येणार असून दहा वर्षावरील कोणालाही कार्यशाळेत सहभागी होता येईल. सहभागी होणाऱ्यांनी स्वत:चे लेझीम आणणे आवश्यक आहे. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी सोनाली गुजराथी- ९८१९९२१२२०, चैत्राली भावे- ७०४५४१४०६९, सिध्दी वैद्य- ९६६४३५२६९० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *