प्लास्टिकविरोधी कारवाईत आत्तापर्यंत २४ लाख ६५ हजार रुपयांचा दंड वसूल
मुंबई दि.०६ :- बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने मुंबई शहर आणि उपनगरात सुरू केलेल्या प्लास्टिकविरोधी कारवाईत आत्तापर्यंत २४ लाख ६५ हजार रुपयांचा दंड वसूल केला असून एकूण १०४ किलोहून अधिक प्लास्टिक जप्त केले.
अवकाळीतील पीक कर्ज व्याज माफीची तत्काळ कार्यवाही करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुचनेनुसार महापालिकेने ऑगस्टपासून प्लास्टिकबंदीची कारवाई पुन्हा नव्याने सुरू केली आहे. सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकचे डबे, चमचे, वाट्या, ग्लास, वाडगे आदी विविध प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू वापरणाऱ्यांवर, तसेच त्यांची विक्री करणाऱ्यांवर महानगरपालिका प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
अभिनेते अंकुश चौधरी यांचे आगळे रक्षाबंधन!
प्रथम गुन्ह्यासाठी पाच हजार रुपये, तर दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने सोमवारी ५९७ दुकाने व आस्थापनांना भेट देऊन एका दिवसात ९५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.