Skip to content
पुणे दि.२९ :- थर्माकोल,प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर केल्यामुळे पर्यावरण आणि निसर्गची हानी होत असून याचे घातक परिणाम पाणी आणि जमिनीवरही होत आहेत. त्यासाठी थर्माकोल, प्लॅस्टिकचा वापर बंद करून पर्यावरण जतन, संवर्धनाच्या चळवळीत प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यावरण दक्षता मंचचे अध्यक्ष प्रशांत अवचट यांनी येथे केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय मजदूर संघाच्या पुणे जिल्ह्यातर्फे विश्वकर्मा भवन, शनिवार पेठ येथे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण, पर्यावरण रक्षण मंचाचे पुणे जिल्हा प्रमुख अभय वर्तक यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमास भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.