Skip to content
मुंबई दि.२८ :- बनावट कागदपत्रांच्या आधारे विरार पोलिसांनी उघडकीस आणलेल्या अनधिकृत इमारत घोटाळ्यातील इमारतींची संख्या ५५ वरून आता ११७ झाली आहे. आणखी ६२ इमारती अनधिकृत असल्याचे समोर आले आहे.
वसई विरारमधील विविध पोलीस ठाण्यात या ११७ इमारतींप्रकरणात शंभरहून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या ११७ इमारतींपैकी सिडको काळातील ३४ तर पालिकेच्या काळातील ८४ इमारतींचा समावेश आहे.
प्रभाग समिती सी (चंदनसार), बी (नालासोपारा), डी (आचोळे), जी (वालीव) एच (नवघर माणिकपूर) आदींमध्ये या इमारती बांधण्यात आल्या होत्या. या इमारतींचा पंचनामा केल्यानंतर सर्वच्या सर्व ११७ इमारतींवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात १०० हून अधिक आरोपी आहेत.