Skip to content
दुसरा, पाचवा दिवस आणि अनंत चतुर्दशी
मुंबई दि.२६ :- यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात केवळ तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वानिक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. गणेशोत्सवात दुसरा दिवस, पाचवा दिवस आणि अनंत चतुर्दशी असे तीन दिवस रात्री उशीरापर्यंत ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे तीनही दिवस विसर्जनाचे दिवस आहेत.
यंदा गौरी गणपतींचे पाच दिवसांनी विसर्जन होत असल्यामुळे सातव्या दिवशी दिली जाणारी परवानगी रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, दरवर्षी गणेशोत्सवात चार दिवस रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली होती. यंदा पाचव्या दिवशी गौरी गणपती विसर्जन होत असून हा एक दिवस कमी करण्यात आला आहे.
तसेच पुण्यात पाच दिवसांची परवानगी दिली असताना मुंबईवर मात्र अन्याय करण्यात आला आहे. मुंबईबाबत दुजाभाव न करता एक दिवस वाढवून द्यावा, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.