Skip to content
मुंबई दि.२५ :- हिंदु धर्माला पाण्यात पाहाणार्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) या वेळीही हिंदु धर्मद्वेष प्रकट करण्याची संधी सोडली नाही. इस्रो’ चंद्रावर पोहोचली; मात्र ‘अंनिस’ अजूनही अंधश्रद्धेच्या डबक्यातच आहे, अशी टीका हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केली आहे.
अंनिसवाल्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर ‘चांद्रयान मोहिम यशस्वी होण्यासाठी पूजा, मंत्र, तंत्र, होम हवन उपयोगी ठरणार नसून अचूक तंत्रज्ञानच ही मोहिम यशस्वी करू शकेल’ अशी पोस्ट केली आहे. ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांना उपदेशाचे डोस देणारी अंनिस स्वतःला ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांपेक्षा मोठी समजते का ? जो धर्माचरण करतो, त्यालाच त्याचे लाभ कळतात. धर्माचरण न करताच ‘त्याने काही लाभ होत नाहीत’, असे म्हणणे ही अंनिसवाल्यांची ‘अंधश्रद्धा’च असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
प्रत्येक कामाचा आरंभ हा देवतेच्या आशीर्वादाने करणे, त्यातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करणे, विधि करणे, ही हिंदू धर्मपरंपरा आहे. ‘इस्रो’मधील शास्त्रज्ञ हे त्यांची प्रत्येक अंतराळ मोहिम चालू करतांना त्या यानाची प्रतिकृती श्री तिरूपति येथील बालाजी मंदिरात ठेवून पूजा करतात, तसेच यान अवकाशात सोडण्यापूर्वीही मुहूर्तावर आणि पूजाविधी करतात. आस्तिक असूनही विज्ञाननिष्ठ असणे, ही भारताची गौरवशाली परंपरा आहे; असे शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.