Skip to content
मुंबई दि.१४ :- मुसळधार पावसाने किंवा रेल्वे रुळांवर पाणी साचून रेल्वे मार्गावरील पॉईंटमध्ये बिघाड होऊ नये यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून या पॉईंटजवळ जलरोधक यंत्रणा बसविण्यात आली आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस छ ते भायखळा रेल्वे स्थानका दरम्यान ही जलरोधक यंत्रणा बसविण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान एकूण ४३१ पॉईंट तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल एकूण १३८ पॉईंट आहेत. पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साचून पॉईंट बिघडण्याच्या घटना घडतात. त्यामुळे भायखळा येथील सिग्नल आणि दूरसंचार दुरुस्ती विभागाने मुसळधार पावसात होणारे पॉईंट बिघाड कमी करण्यासाठी २५ पॉईंट यंत्रणेला जलरोधक यंत्रणा बसविली आहे.
मध्य रेल्वेच्या अन्य पॉईंटवर लवकरच ही यंत्रणा बसविली जाणार आहे. पॉईंट मशीनचे आवरणही मजबूत करण्यात आले असून त्यामुळे लोकल सेवा सुरळीत सुरू राहील, असा विश्वास मध्य रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.