Skip to content
मुंबई दि.१४ :- जुहू चौपाटी येथे रविवारी सायंकाळी सहा पर्यटकांना जेलीफिशचा दंश झाल्याची घटना घडली. या सर्वांवर रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले.
संध्याकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान समुद्रकिनाऱ्यावर गेलेल्या सहा जणांना जेलीफिशचा दंश झाला. त्रास होऊ लागल्यामुळे या सहा जणांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.