ह्युंदाई’ कंपनी पुण्यात पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार- उदय सामंत
मुंबई दि.१३ :- वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या ‘ह्युंदाई’ कंपनीने पुण्यात दोन टप्प्यांत पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
कसारा रेल्वे स्थानकात आरपीएफ जवानाचा अपघाती मृत्यू
राज्यात अधिकाधिक गुंतवणूक वाढविण्यासाठी सामंत यांच्या नेतृत्वाखाली उद्योग विभागाचे शिष्टमंडळ दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात तेथील आघाडीच्या कंपन्यांशी सविस्तर चर्चा झाली असून, त्यांनी राज्यात भरीव गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहे.
अभिनेत्री श्रीदेवी यांना गुगलची आदरांजली
‘ह्युंदाई’ कंपनी २०२८ पर्यंत दोन टप्प्यांत पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यातून ४ हजार ५०० जणांना रोजगार मिळणार आहे. तसेच त्यांचे पुरवठादारही चार हजार कोट रुपयांची गुंतवणूक करणार आहेत, असे सामंत म्हणाले.