Skip to content
मुंबई दि.१३ :- मध्य रेल्वेवरील कसारा स्थानकात कर्तव्यावर असलेले आरपीएफ जवान डी.एफ. सोनवणे यांचा आज सकाळी कसारा रेल्वे स्थानकात अपघाती मृत्यू झाला.
रविवारी सकाळी सातच्या सुमारास कानपुर सेंट्रल एक्स्प्रेस कसारा स्थानकाच्या फलाट क्रमांक एक वर आली. त्यावेळी गाडीतील एका डब्यात प्रवाशांचे आपापसात भांडण सुरू होते. भांडण मिटविण्यासाठी सोनवणे डब्यात गेले होते.
भांडण मिटवून ते गाडीच्या डब्यातून बाहेर पडताना फलाट आणि गाडीच्या पोकळीत अडकून चालत्या गाडीखाली आले आणि यातच ते मृत्यूमुखी पडले.