(masala chai recipe)
साहित्य:
२ चहाचे कप पाणीअडीच चहाचे कप दुध
३ ते ४ टिस्पून साखर किंवा चवीनुसार
२ टिस्पून चहा पावडर (chai masala)
१/२ टिस्पून किसलेले आले किंवा २ पाती गवती चहा किंवा १/२ टिस्पून वेलची पूड किंवा दीड चमचा चहाचा मसाला
कृती:
१) दुध आणि पाणी पातेल्यात एकत्र करा. साखर आणि आले/गवती चहा/वेलचीपूड/चहाचा मसाला घालून मोठ्या आचेवर पातेले ठेवावे.
२) दुध-पाणी वाफाळायला लागले, की त्यात चहा पावडर घालून आच मध्यम करावी. [पाण्यामध्ये दुध घातले असल्याने मिश्रण उकळल्यावर उतू जाते. म्हणून चहाकडे लक्ष ठेवावे.]
३) चहा १-२ मिनिटे उकळू द्यावा. आच बंद करून चहा मिनिटभर झाकून ठेवावा. नंतर गाळून गरमच सर्व्ह करावा.
टीप:
१) साखरेचे प्रमाण चहा मध्यम गोड होईल असेच दिले आहे. जास्त गोड हवा असल्यास साखरेचे प्रमाण वाढवावे.
२) काही चहा पावडर माईल्ड तर काही स्ट्रॉंग असतात. स्ट्रॉंग असल्यास वरील प्रमाणातच चहा पावडर वापरावी. माईल्ड असल्यास अर्धा चमचा जास्त घालावी.