Skip to content
नवी दिल्ली दि.११ :- राष्ट्रवादी काँग्रसचे नेते, आमदार नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मंजूर केला. हा जामीन दोन महिन्यांसाठी असणार आहे. गुन्हेगारी जगताशी असलेले कथित संबंध आणि मनी लाँण्ड्रिंग प्रकरणी २३ फेब्रवारी २०२२ रोजी मलिक यांना अटक करण्यात आली होती.
नवाब मलिक यांनी वैद्यकीय कारणासाठी उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. पण, १३ जुलैला उच्च न्यायालयाने मलिक यांचा जामिन अर्ज फेटाळला. याबाबत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
मलिक यांच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मलिक यांना जामीन देण्यात यावा, अशी मागणी केली होती. या मागणीला ‘ईडी’कडून महाधिवक्ता तुषार मेहता यांनीही विरोध केला नाही. त्यामुळे मलिक यांना जामीन मिळाला आहे.