नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करण्यात येईल- उपमुख्यमंत्री फडणवीस
मुंबई दि.०३ :- कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात दिली. देसाई यांच्या आत्महत्येच्या धक्कादायक प्रकारणी विधिमंडळात चर्चा झाली आणि देसाई यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी
काँग्रेस सदस्य अशोक चव्हाण यांनी याची सखोल चौकशी व्हावी. देसाई यांच्या स्टुडिओचा लिलाव न करता शासनाने हा स्टुडिओ ताब्यात घ्यावा, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे सांगितले. तर भाजपचे आशिष शेलार म्हणाले, पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर येत असून कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. तसेच काही ऑडिओ क्लिपही समोर आल्या आहेत. त्यामुळे याची चौकशी केली जावी.
मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ
देसाई यांच्यावर कर्ज होते. त्यांनी स्टुडिओ गहाण ठेवला होता. स्टुडिओ सोडविण्याचा ते प्रयत्न करत होते. स्टुडिओ ताब्यात घेण्यासाठी जाणीवपूर्वक दबाव टाकण्यात आला का? नियमाच्या बाहेर जाऊन व्याज लावून अडकवण्याचा प्रयत्न झाला का? याची सखोल चौकशी राज्य शासन करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. दरम्यान देसाई यांच्या पार्थिवावर उद्या ( शुक्रवारी) एनडी स्टुडिओत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.