शहापूर येथे गर्डरसहक्रेन कोसळून २० कामगारांचा मृत्यू
ठाणे दि.०१ :- समृद्धी महामार्गावर ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे सोमवारी मध्यरात्री गर्डरसह क्रेन कोसळून झालेल्या अपघातात २० कामगारांचा मृत्यू झाला. तीन कामगार जखमी झाले आहेत. शहापूर सरलांबे येथे ही दूर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजुरांवर कोसळला. आणखी नऊ कामगार या गर्डरखाली अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
डॉ. सदानंद मोरे यांचे उद्या व्याख्यान
एनडीआरएफ च्या दोन तुकड्या घटनास्थळी पोहचल्या असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. दरम्यान मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.