बेपत्ता महिलांच्या तपासासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून शोधमोहीम राबवावी- रुपाली चाकणकर
मुंबई दि.१६ :- गेल्या तीन महिन्यात राज्यातून १६ ते २५ वयोगटातील तीन हजार ५९४ तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. या महिलांच्या तपासासाठी गृह विभागाने स्वतंत्र समिती स्थापन करून शोध मोहिम राबवावी आणि दर पंधरा दिवसांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आय़ोगास सादर करावा अशी सूचना गृह विभागाला केली आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी येथे दिली.
वांद्रे-वर्सोवा सीलिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात यावे- उपमुख्यमंत्री फडणवीस
बेपत्ता महिलांचा वेळेत शोध न लागल्यास आखाती देशांमध्ये त्यांची तस्करी होण्याचे प्रकार समोर आले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड भागातील ८२ कुटुंबाच्या घरातील महिला परदेशी गेल्या असून त्यांच्याशी कुठलाच संपर्क राहिला नसल्याने त्यांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त होते आहे. १ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान राज्यातील ३ हजार ५९४ महिला हरविल्या आहेत, यातील काहींचा शोध लागला असला तरी एकंदरीतच ही गंभीर बाब असल्याचे मत चाकणकर यांनी व्यक्त केले.