बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील माने यांच्याकडून माफीचा साक्षीदार होण्यासाठीची याचिका मागे
मुंबई दि.१० :- बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील माने याने अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांडात माफीचा साक्षीदार होण्यासाठी न्यायालयात केलेली याचिका मागे घेतली. दरम्यान मानेकडे कायद्याची पदवी असल्यामुळे स्वतः खटला चालविण्याची विनंती न्यायालयाने मान्य केली आहे.
आदित्य ठाकरे आणि राज्यपाल बैस यांची राजभवनवर भेट अर्धा तास चर्चा
बडतर्फ पोलीस निरीक्षक सुनील माने याला अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हत्याकांड प्रकरणात एनआयए अटक केली असून माने सध्या तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे.
‘म्हाडा’ कोकण मंडळ घरांच्या संगणकीय सोडतीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
सुनील माने याने १७ फेब्रुवारी रोजी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता, या अर्जात त्याने ‘माफीचा साक्षीदार’ होण्यासाठी आणि गुन्ह्याबद्दल जे काही माहित होते ते उघड करण्याची परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती. मात्र मंगळवारी माने याने न्यायालयात केलेली ही याचिका मागे घेतली आहे