लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे परिक्षेत्रात चार महिन्यांत ३८ गुन्हे दाखल, ५३ आरोपींना अटक
ठाणे दि.०६ :- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे परिक्षेत्रामध्ये लाच स्वीकारणे आणि मागणे या प्रकरणी गेल्या चार महिन्यांत एकूण ३८ गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनांमध्ये एकूण ५३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये वर्ग तीन कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे ३० इतकी आहे.
मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक
ठाणे परिक्षेत्रात ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे. ठाणे परिक्षेत्रामध्ये २०२२ च्या जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत लाचखोरीसंदर्भात २९ गुन्हे दाखल झाले होते. याच कालावधीमध्ये यंदाच्या वर्षी ही संख्या वाढली आहे. २०२३ या वर्षी एप्रिलअखेर ३८ गुन्हे दाखल झाले आहेत.
केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचार दौ-यावर
या गुन्ह्यांमध्ये लाच मागितल्यचे ७ गुन्हे आहेत. अटक करण्यात आलेल्या या आरोपींमध्ये सर्वाधिक लाचखोर कर्मचारी वर्ग तीनचे असून अन्य आरोपींची संख्या १० आहे. तर, वर्ग एकचे दोन अधिकारी, वर्ग दोनचे सहा आणि वर्ग चारचे पाच कर्मचारी आहेत.