‘बेस्ट’ बसमध्ये ऑडिओ,व्हिडिओ पाहण्यास, इअरफोन आवश्यक
मुंबई दि.२८ :- बेस्ट बसमधून प्रवास करताना हेडफोन अथवा इयरफोनशिवाय भ्रमणध्वनीवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणा-या प्रवाशांच्या विरोधात आता पोलीस कारवाई केली जाणार आहे. ‘बेस्ट’ प्रशासनाने एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे भिवंडी तालुक्यातील खलिंग खुर्द गावात पादचारी पूल उभारण्यात येणार
बेस्ट उपक्रमाची परिवहन सेवा ही सार्वजनिक परिवहन सेवा असून बसगाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास अन्य प्रवाशांकडून होऊ नये यासाठी मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत (कलम ३८/११२) सदर प्रवाशावर कारवाई केली जाणार आहे.
नाकाद्वारे देण्यात येणारी करोना प्रतिबंधक लस आजपासून मुंबईत २४ केंद्रांवर उपलब्ध
इअरफोन/हेडफोनशिवाय भ्रमणध्वनीवर ऑडिओ/व्हिडिओ ऐकण्यास/बघण्यास तसेच मोठ्या आवाजात बोलण्यास मनाई करण्यात येत असल्याचे बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले आहे.