उत्तम संसदपटू होण्यासाठी जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास करणे आवश्यक- राज्यपाल बैस
मुंबई दि.१९ :- उत्तम संसदपटू होण्यासाठी सभागृहात जनतेचे कोणते प्रश्न उपस्थित करायचे आणि ते प्रभावीपणे कसे मांडायचे त्या दृष्टीने अभ्यास करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी काल येथे केले. राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र शासन व युनिसेफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या युवकांच्या अभिरुप संसदेच्या सदस्यांनी मंगळवारी राज्यपाल बैस यांची राजभवन येथे भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठीच काम करणार- अजित पवार
जी व्यक्ती देशसेवा, धर्मकार्य व समाजकार्य या विषयात काम करते, त्या व्यक्तीला समाज अनेक वर्षे लक्षात ठेवतो, असे सांगून युवकांनी सर्वप्रथम देशाचा विचार करावा, असे राज्यपालांनी सांगितले. युवक देशाचे भावी नागरिक आहेत. त्यामुळे त्यांनी संसदीय लोकशाहीच्या कार्यान्वयनात रुची घ्यावी. या दृष्टीने अभिरूप संसद हा चांगला उपक्रम असल्याचे राज्यपाल म्हणाले.
‘म्हाडा’ कोकण मंडळ घरांच्या सोडतीला यंदा कमी प्रतिसाद – अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल
राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ रामेश्वर कोठावळे, युनिसेफ महाराष्ट्राच्या अधिकारी डॉ स्वाती महापात्रा तसेच राज्याच्या सर्व जिल्ह्यांमधून आलेले अभिरुप संसदेचे ७५ सदस्य उपस्थित होते.